✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.1डिसेंबर):-तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या ग्रामपंचायतींमध्ये 18 डिसेंबरला मतदान होणार. असल्याने गावागावात ऐन थंडीच्या कडाक्यात राजकीय वातावरण चांगले तापू लागले आहे.
गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा, कोळगाव, माटेगाव, हिरापूर, पाडळशिंगी, जातेगाव, खेळेगाव, पाचेगाव खांडवी, दैठण, धोंडराई आधी महसूल मंडळातील अनेक ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण तापले असून उमेदवारांची बांधणी तयारी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे