Home महाराष्ट्र कारंजा येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध

कारंजा येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध

142

🔹तहसिलदार मार्फत राष्ट्रपतीला पाठविले कोष्यारीवर कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन

✒️कारंजा घाडगे(विशेष प्रतिनिधी)

कारंजा(घा)(दि.30नोव्हेंबर):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोष्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.मागील काही दिवसा अगोदर मराठा विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात कोष्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल अपमानास्पद वक्तव्य करून महाराष्ट्रातील संपुर्ण बहुजनवादी विचारधारेच्या कार्यकर्त्यांचे मन दुखविले आहे.अनेकदा कोष्यारी यांनी बहुजनवादी महापुरुषा बद्दल अपमानाचे वक्तव्य केले.

या अगोदर सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि आता एकदा पुन्हा शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानाचे वक्तव्य भगत कोष्यारी यांनी केले या सर्व वक्तव्याचा निषेध म्हणून शहरांतील शिव,फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी भगत कोश्यारी विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.त्यानंतर कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्या प्रमूख उपस्थितीत नायब तहसिलदार राऊत मार्फत राष्ट्रपती मुर्मु यांना भगत सिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कार्यवाही करण्या संदर्भात निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे संदीप भिसे,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष पियूष रेवतकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटिल, संगीता पाटिल,कांचन गजभिये, लालचन सोनटक्के प्रज्वल बारंगे, उमेश पाचपोहर, गजानन बोडखे, सचिन बोडखे, प्रमोद पखाले, संजय पखाले, शुभम नासरे,गीता कळसकर आदी इतर बहुजनवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here