✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.30नोव्हेंबर):-तालुका हा डोंगराळ व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये मोबाईल नेटवर्क चा खूप मोठा प्रश्न आहे,आणि या भागात नेटवर्क ची अत्यंत आवश्यकता आहे.कारण डिजिटल शिक्षण प्रणालीमध्ये सर्व मोबाईल वर ऑनलाईन शिक्षण झालेला आहे म्हणून जिवती तालुक्यातील विद्यार्थी नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण पासून वंचित राहत आहे.
म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन जिवती तालुक्यातील नेटवर्क ची समस्या आपल्या माध्यमातून दूर व्हावी आणि सर्व सामान्य जनतेलाही नेटवर्क चा लाभ घेता यावा यासाठी आपण लक्ष घालून आमची मागणी पूर्ण करून द्याल अशी विनंती राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.