🔸साकोली तालुक्यातील पापडा गावातील घटना
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
भंडारा(दि. 30 नोव्हेंबर):-अचानक घरून बेपत्ता झालेल्या श्रद्धा आठ वर्षीय विद्यार्थिनींच्या मृतदेह जळालेल्या अवस्थेत तनसाच्या ढिगात सापडल्याने पापडा गावात तणाव निर्माण झाला आहे या चिमुकली चा शोध साकोली पोलीस कडून घेतला जात असताना हा भयंकर प्रकार उघडकीस आला श्रद्धा किशोर सिडाम असे मृत चिमुकलीचा नाव असून तिचा मृत्यूवर किंवा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. त्या दृष्टीने पोलिस आता शोध घेत आहेत.
साकोली तालुक्यातील पापडा खुर्द येथील श्रद्धा किशोर श्रीराम हे आठ वर्षाची चिमुकली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसऱ्या वर्गात शिकत होती” सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामाच्या निमित्ताने दुपारी सुट्टी देण्यात आली. संध्याकाळी जवळपास चार वाजेपर्यंत श्रद्धा आपल्या बहिणीसोबत घरी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ती घराबाहेर खेळायला गेली. मात्र बराच उशीर होऊन ती घरी परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली. शोध घेतल्यानंतर श्रद्धा मिळाली नसल्याने याची माहिती साकोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी शोधासाठी हालचाली सुरू केल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यावर लक्ष पूर्वक काम करीत होते.
शोधण्याच्या दृष्टीने श्वानपथकाचाही वापर केला गेला. आज दिनांक 30 नोव्हेंबर बुधवारला सकाळी श्रद्धाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत पापडा येथील गावाजवळ असलेल्या तनसाच्या ढिगात सापडल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे . माहिती मिळतात स्वतः पोलिस अधीक्षक साकोली पोलिसांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून यानंतर घटनेच्या कारणाचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू झाला आहे. यामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही परंतु श्रद्धाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने पुढील तपास सुरू आहे.