Home महाराष्ट्र शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांना तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी समता शिक्षक परिषदेतर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक...

शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांना तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी समता शिक्षक परिषदेतर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर !….

228

🔹२५ डिसेंबर, २०२२ ला जळगाव येथे होणार वितरण

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.30नोव्हेंबर):- धरणगाव शहरातील गुड शेफर्ड अकॅडमी स्कूलचे उपशिक्षक, धरणगाव शहरात सामाजिक कार्य करणारे, शिवव्याख्याते – लक्ष्मणराव पाटील यांची सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समता शिक्षक परिषद यांच्यातर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी ” जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार ” जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांनी ही नियुक्ती केली आहे. पुरस्काराचे वितरण जळगाव येथे २५ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.

शहरात पाटील यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. पुरस्काराने ऊर्जा मिळते. शिक्षणाचे आद्य जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी मला “सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला याचा मला मनस्वी आनंद आहे. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर विचार मनामनात आहे आणि ते सामान्यांपर्यंत पोहोचवीत आहोत माझ्या शैक्षणिक सामाजिक कार्याची पावती आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले

इण्डियाज फर्स्ट वॉल ऑफ डिफेन्स म्हणजे काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here