Home महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक हक्काच्या पैशापासून वंचित

यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक हक्काच्या पैशापासून वंचित

151

🔹भविष्य निर्वाह निधी विभाग ऑनलाईन होणे आवश्यक असताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.9823995466

उमरखेड(दि. 29 नोव्हेंबर):-भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांसाठी अडचणीच्या वेळी कामी येणारा असून सर्वच माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या पोटाला चिमटा घेऊन भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसा जमा करतात हा विभाग ऑनलाईन करण्यासंदर्भात शासनाचा अध्यादेश असताना देखील शिक्षण उपसंचालकापासून सर्वच अधिकारी अनुसाही असल्याचे दिसून येत आहे. यामागे आर्थिक नुकसानीचे कारण देखील असू शकते.

मार्च 2022 पासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अंतिम प्रधान अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. तसेच सातव्या वेतन आयोगाचा अद्याप दुसरा हप्ता भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा झालेला नाही. भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसा जमा ठेवण्याचे मुख्य कारण वेळेवर आलेल्या आरोग्याच्या समस्या, मुलांचे शिक्षण, मुली मुलांचे विवाह, घर बांधकाम यासाठी हा पैसा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा ठेवतात परंतु वेतन पथक अधीक्षकांकडून यवतमाळ जिल्ह्यासाठी कोणते नियम लावले यासंदर्भात शिक्षक व्यथीत आहेत.

भविष्य निर्वाह निधीची बिले विविध नियम लावून माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कमीत कमी देण्याचा घाट वेतन पथकाने घातलेला आहे.

यापुढेही जाऊन मंजूर झालेली बिले जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये केली असता तिथे त्रुटी काढून ती बिले पुन्हा परत पाठवली जातात. दिवाळीच्या काळात बीडीएस बाबतही असाच संभ्रम निर्माण झाला होता.

माध्यमिक शिक्षकांच्या अनेक लहान मोठ्या संघटना आम्हीच शिक्षकांचे खरे ताराणहार आहोत असे दाखवण्याचा नेहमी आटापिटा करत असतात विद्यमान शिक्षक आमदार किरण सरनाईक ,पदवीधर आमदार रणजीत पाटील हे सध्या निवडणुकीत गुंग आहेत.त्यांनी व विदर्भातील सर्वात मोठी संघटना असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व परिषद यांचे पदाधिकारी देखील याबाबत बोलण्यास तयार नाहीत.

वरिष्ठ पातळीवर आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळे सावकारी पाशात अडकलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न होतील का असा प्रश्न माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विचारत आहेत.

चौकट:- माध्यमिक वेतन पथक अधीक्षक गुंडे यांना याबाबतीत माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता यापूर्वी त्यांनी मी तुम्हाला नंतर माहिती देतो असे सांगितले व आज भ्रमणध्वनी स्वीकारला नाही.

चौकट:- भविष्य निर्वाह निधीचा पैसा हा शिक्षकांच्या हक्काचा आहे तो त्यांना वेळेत मिळालाच पाहिजे- अरविंद देशमुख
(प्रांतिक उपाध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

चौकट:- [शासन निर्णयाची अंमलबजावणी करून अमरावती विभागातील भविष्य निर्वाह निधीची सर्व कार्यालये ऑनलाईन करण्यासंदर्भात मी लेखी निवेदन दिलेले आहे. त्या संदर्भात मी मंत्री महोदयाची सुद्धा चर्चा करणार आहे] – संगीता शिंदे
शिक्षण संघर्ष संघटना

[चौकट :- भविष्य निर्वाह निधीचे पैसे हे कर्मचाऱ्यांच्या हक्काचे आहेत. त्यांना ते वेळेत मिळायलाच हवे यासंदर्भात मी शिक्षण मंत्रीशी चर्चा करणार आहे] -शेखर भोयर) शिक्षक महासंघ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here