Home पुणे इंग्रजी विषय तज्ञ बाळासाहेब आल्हाट यांना राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार...

इंग्रजी विषय तज्ञ बाळासाहेब आल्हाट यांना राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

203

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.30नोव्हेंबर):- महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमी महाराष्ट वतीने राज्यभरातील निवडक शिक्षक- शिक्षिका महात्माफुले, साविञीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आले.

यावेळी इंग्रजी तज्ञ बाळासाहेब आल्हाट यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपञ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब आल्हाट हे सध्या पिंपरी चिंचवड मनपाच्या भोसरी येथिल छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आहे.या कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट सेवा समूह व रयत प्रकाशनने केले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन ज्ञानेश महाराज, डाॅ.जितेंद्र आव्हाड, खासदार राजू शेट्टी, डाॅ. पी. ए. इनामदार, अॅड. श्रीकांत शितोळे, डाॅ.श्रीमंत कोकाटे तसेच स्वागताध्यक्ष डाॅ. सी. टी. कुंजीर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ.श्रीमंत कोकाटे यांनी केले. संयोजन लहुजी लांडगे, रवींद्र ढमढेरे, प्रा.सोमनाथ गोडसे, प्रा. डाॅ. सारिका बहिरट, रमेश बाडे, प्रा. औंदूबर लोंढे यांनी केले.

ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here