✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.29नोव्हेंबर):-सामाजिक क्रांती करून ज्यांनी भारतीय संविधानाचा तात्त्विक आराखडा तयार केला,त्या म.जोतीराव फुले यांचा स्मृती सोहळा चार्वाकवनात प्रचंड उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सेवा निवृत साखर संचालक मा,के.ई.हरिदास साहेब,औरंगाबाद हे होते , तर प्रमुख वक्ते म्हणून श्याम उर्फ पूर्णचंद्र मेश्रामसाहेब नागपूर, मा.विनायक कांडलकर जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज अमरावती, डाॕ.सुधाकरराव डेहनकर,सचिव सत्यशोधक समाज ,विदर्भ प्रदेश,आनंद भगत उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा (राजरत्न आंबेडकर )हे उपस्थित होते.
सामाजिक क्रांती यशस्वी करण्यासाठी म.जोतीराव फुले यांनी १५० वर्षापूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .चालू वर्ष हे सत्यशोधक समाजाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.म.फुलेनी भारतात एकमय समाज निर्मितीसाठी तात्त्विक पायाभरणी केली.त्यावर भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरानी संविधाना तयार करून इमला चढविला.संविधान रूपी इमारत उध्वस्त करण्याचा कट सनातन धर्मियांनी रचला आहे .म्हणून संविधान संरक्षणासाठी तमाम बहुजन वर्गानी सर्वसमावेश असलेल्या सत्यशोधक समाजाच्या झेंड्याखाली संघटीत होऊन मुकाबला करणे अत्यावश्यक आहे.’ अशा आशयाचे आवाहन मा,हरिदाससाहेब यांनी अध्यक्षीय समारोप करतांना केले.
तत्पूर्वी प्रमुख पाहुणे सर्व पूर्णचंद्र मेश्रामसाहेब,विनायकराव कांडलकर ,डाॕ.सुधाकरराव डेहनकर आणि आनंद भगत याची समयोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमास मा.नारायणराव क्षीरसागर,मनोहरराव भगत,तायरखान पठाण,एस.टी.भगत,लेवा,माधवराव खंदारे,उमरखेड,भीमराव भवरे मोहदी,सुनील सुखदिवे आर्णि,भूषण भगत आर्णि यांची उपस्थिती लाभली होती.
कर्तृत्वान आणि गुणी व्यक्तीचा गौरव करण्याची संस्थेची परंपरा आहे.यापूर्वी तळणीचे रामाजी सारंगे,स्मृतीशेष ज्येष्ठ सत्यशोधक ,वणीच्या राणानूर सिद्दकी, सावित्रीई पुरस्कार प्राप्त ,आर्णिच्या तलाक पिडित रेहाना बालीम ,सत्यशोधक सेनेचे कार्येकर्ते स्मृतीशेष पंजाबराव हनवते यांचा सत्कार संस्थेने केला आहे.आज ज्येष्ठ समाजसेवक तथा से.नि.शिक्षक गोकुलदास वंजारे यांचा सत्कार म.फुले स्मृतिदिन कार्यक्रमात करण्यात येत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॕड.अप्पाराव मैन्द यांनी अशी माहिती दिली आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख पाहूणे आणि संस्थेचे विश्वस्त यांच्यासह गोकुलदास वंजारे गुरूजी यांचा शाल ,दोन ग्रंथ आणि बुद्ध प्रतिमा देऊन आणि पुष्पहार घालून सत्कार केला.सत्कारमूर्ती वंजारे गुरूजी यांनी सत्काराला उत्तर देतांना केलेल्या संघर्षाची माहिती दिली आणि संस्थेचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संस्थेचे विश्वस्त गोवर्धन मोहिते यांनी मानले.सुत्रसंचालन यशवंत देशमुख आणि रमाकांत मामीडवार यांनी केले.स्नेहभोजनानी कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.