✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.२९ नोव्हेबर):-मंगळवार रोजी मा.आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात आ. किशोरभाऊ जोरगेवार यांचा सुचनेनुसार यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस संघटक विलास वनकर यांनी श्री.सत्यशीव गुरुदेव सेवा मंडळ व जेष्ठ नागरिक संघ घुग्घुस यांच्या तर्फे चालु असलेल्या ” ग्राम सफाई अभियान ” काम करीत असून त्यांना घमीले, पावडे,सबल व झाडू वस्तु भेट देण्यात आले.
सत्यशिव गुरुदेव मंडळाचे अध्यक्ष श्री.मधुकर मालेकर यांनी म्हनाले आ.किशोरभाऊ जोरगेवार यांना काही दिवसापूर्वी ग्राम सफाई अभियान करीत आहो.धार्मिक स्थळ, स्मशान भूमी इतर कामे स्वच्छ करण्यात येत आहे,असे आ. किशोरभाऊ सांगितले होते ते आज दिनांक २९ नोव्हेंबर मंगळवार रोजी टोपले, पावडे,सबल्ल,झाडु इतर स्वच्छ अभियान राबविण्यात येणारे वस्तु भेट देऊन समाज सेवक दर्शविण्यात आले.श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळतर्फे आ. किशोरभाऊ मनापासून आभार व्यक्त करतो,असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस संघटक विलास वनकर, नेते इमरान खान, मयुर कलवल, स्वप्नील वाढई, प्रतीक वनकर,श्री.सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष श्री.मधुकर मालेकर, सचिव श्री.विनोबा बोबडे,उपाध्यक्ष श्री.गंगाराम बोबडे, बालाजी धोबे,शामराव कांबळे, नंदुभाऊ ठेंगणे, लक्ष्मण ठाकरे, वासुदेव ठाकरे, सोनबाजी बदखल,महिला सदस्य श्री.जनाबाई निमकर व आ. किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.