Home महाराष्ट्र भाष्कर लक्ष्मणराव बावणकर चिमूर यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान

भाष्कर लक्ष्मणराव बावणकर चिमूर यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान

112

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.29नोव्हेंबर):-28 नोव्हेंबर हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे.

त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले श्री भाष्कर लक्ष्मणराव बावणकर चिमूर इंग्रजी विषय शिक्षक जय लहरी जय मानव विद्यालय मदनापूर तथा जिल्हाअध्यक्ष महा .राज्य शिक्षक भारती संघटना चंद्रपूर, चिमूर तालुका क्रीडा संयोजक यांना सामाजिक बांधिलकी मानून शैक्षणिक उल्लेखनीय कार्य , विद्यार्थ्यां व पालकांप्रती बांधिलकी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शिक्षकांना प्रशिक्षण , सामाजिक उद्बोधन यात करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचे वितरण सोमवार दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने (वहिनीसाहेब), डॉ. सुरेशराव जाधव, माजी आमदार राजीव आवळे, विजया कांबळे, डॉ. राजेंद्र दास, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, महादेव निर्मळे, सूरज वाघमारे या मान्यवरांच्या उपस्थितीत मा. भाष्कर बावणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, यात कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र, पाच हजार रुपये किमतीची पुस्तके प्रदान करण्यात आली. या राज्यस्तरीय पुरस्कार समारंभात संपूर्ण महाराष्ट्रातून ९०० नामांकन आले होते त्यात सर्वोत्कृष्ट ५० व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here