✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 28 नोव्हेंबर):-शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्वांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
“विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना व्यक्त गेले वित्तवेना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले” – महात्मा ज्योतिबा फुले
यावेळी भदंत कीर्ती बोधी, शांताबाई दिवेकर यशोधरा धबाले, जिजाबाई दिवेकर, सुबद्राबाई पाईकराव, जानकाबाई इंगोले, भारताबई दिवेकर, उषाताई इंगोले,प्रभावती दिवेकर इत्यादी अनेक बौद्ध उपासक उपासीका उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीम टायगर सेना तथा पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सामजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर यांनी केले.