✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.29नोव्हेंबर);- येथील महाविरनगरातील पारमिता बुध्दविहार येथे संगितमय कार्यक्रमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पारमिता महिला मंडळ महाविरनगर व भारतीय बौध्द महासभेच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी भारतीय संविधानाच्या उदे्शिकेचे वाचन करण्यात आले. तसेच यावेळी आकाश धुळे यांनी संयुक्त भारतीय खेळ फाउंडेशनद्वारा नेपाळमधील पोखरा येथे घेण्यात आलेल्या ७ व्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये २१ किमी धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ, शाल, बुध्द आणि त्यांच्या धम्म ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तथा प्रबोधनकार संतोष गायकवाड व संच यांचा बुध्द ,भिम गिते व संविधान जनजागृतीवर बहारदार संगीतमय कार्यक्रमाने संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी पारमिता महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.