🔹अन्यथा एमआयएम च्या वतीने तिव्र आंदोलनाचा इशारा
✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड(दि.28 नोव्हेंबर):-येथील नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दि 28 नोव्हेंबर रोजी एमआयएम पक्षाच्यावतीने .
शहरातील नगर परिषदेने अवैधरीत्या केलेले अतिक्रमण हटविण्या करिता निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
शहरातील राजे संभाजी महाराज उद्याना समोरील 27 लोखंडी स्टॉल,महात्मा गांधी पुतळ्या मागील 6 लोखंडी स्टॉल, छत्रपती शिवाजी महाराज संकुल मधील राजेश्वर फुल भांडार यांनी संकुलाच्या प्रवेशद्वारा जवळ केलेले अतिक्रमण तसेच महात्मा गांधी पुतळ्यास लागून विनापरवाना विना मंजुरी बांधकाम केलेला ओटा हे अवैधरित्या नगर परिषदेने केलेले अतिक्रमण येत्या 7 दिवसात काढण्यात यावा करिता मुख्याधिकारी न प . उमरखेड, उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदनातून मागणी करण्यात आली.
शहरात झालेल्या नगर परिषदे कडून अवैधरित्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चौकातून ये -जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने .शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत येणे जाणे करावे लागत आहे.
त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होऊन भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची दक्षता घेत मुख्याधिकारी नगरपरिषद उमरखेड यांनी त्वरित निवेदनातून दिलेल्या मागणीचा गांभीर्याने विचार करून संबंधितावर कारवाई करून वरील सर्व प्रकारचे अतिक्रमणे 7 दिवसाच्या आत काढावे अन्यथा एमआयएम पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी एमआयएम तालुका अध्यक्ष एजाज अहमद खान , युथ शहराध्यक्ष शेख आसिफ , तालुका युथ अध्यक्ष अहमद पटेल, माजी नगरसेवक तथा गटनेता जलील कुरेशी , शेख असल सह एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.