✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नागपूर(दि.28नोव्हेंबर):-म. जोतीराव व सावित्रीमाई फाउंडेशन नागपूरच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा भारतीय संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून 26 नोव्हेंबर 2022 ला विविध शाळा स्तरावर संविधान सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षाचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धेत एकूण ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही परीक्षा एकूण १०० गुणाची होती.
परीक्षा ही संपूर्ण भारतीय संविधानावर आधारित होती. स्पर्धेचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचे होते .ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष हिरामण तेलंग, सचिव संदीप गायकवाड ,उपाध्यक्ष कांचन मनोज पाटील, सहसचिव नरेंद्र मडके, प्रब्रम्हानंद मडावी ,दिलीप लोहकरे ,निरंजन माटे ,विजयानंद सावळे, चंद्रशेखर मेश्राम, मुन्ना मेश्राम दीपक आंबुलकर, रवींद्र तीमांडे यांनी सहकार्य केले.