Home महाराष्ट्र एम.जी.एम विद्यापीठ औरंगाबादच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डि.लीट पदवीने सन्मानित

एम.जी.एम विद्यापीठ औरंगाबादच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डि.लीट पदवीने सन्मानित

187

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

औरंगाबाद(दि.28नोव्हेंबर):- येथे एम जी एम एमजीएम विद्यापीठाचा पहिला दीक्षांत कार्यक्रम रुक्मिणी सभागृह येथे पार पडला त्यानिमित्त लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विपुल साहित्य संपादनाची प्रेरणा घेऊन एम जी एम विद्यापीठ औरंगाबाद यांच्या वतिने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डि.लीट पदवीने सन्मानित करण्यात आले ही पदवी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या सनुषा सावित्रीबाई साठे यांना प्रदान करण्यात आली.

पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलपती अंकुशराव कदम कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर कुलगुरू डॉक्टर विलास सकपाळ अधिष्ठता डॉक्टर रेखा शेळके यांच्या हस्ते डिलीट ही पदवी सावित्रीबाई साठे यांना प्रदान करण्यात आली.

यावेळी सावित्रीबाई साठे यांच्या समवेत व्यासपीठावर मानव हित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके साहेब जिजाबाई शेळके गणेशजी भगत लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष दादाराव रोकडे दिलीप हातागळे उपस्थित होते.समोर सर्व पदवीधर युवा युवती व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here