Home महाराष्ट्र संवैधानिक मूल्यांची जपणूक करत समाजाच्या सर्वंकष उत्कर्षासाठी कटिबद्ध राहण्याचा सर्वांनी निश्चय करावा!...

संवैधानिक मूल्यांची जपणूक करत समाजाच्या सर्वंकष उत्कर्षासाठी कटिबद्ध राहण्याचा सर्वांनी निश्चय करावा! – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

221

🔸घुग्गुस येथील जि. प. उच्च प्राथमिक (मुली) शाळेत संविधान सन्मान दिन साजरा

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.28नोव्हेंबर):-येथील जि. प. उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेत आज सकाळी संविधान दिनानिमित्त “संविधान सम्मान दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि संविधानास पुष्प अर्पण करून प्रमुख पाहुण्यांनी अभिवादन केले.भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शाळकरी चिमुकल्यांशी संवाद साधत सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना, आजच्याचं दिवशी २६ नोव्हेंबर इ.स. १९४९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून देशाला अर्पण केली. व पुढे २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली. आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारतात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून आज देशभर शासकीय, राजकीय तसेच सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केल्या जातात.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही आज जिल्ह्यात सर्वत्र बूथ स्तरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्याठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केल्या जात आहे. तर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आणि रॅलींचेही आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्ये आपल्याला प्रदान केली आहेत. या मूल्यांची जपणूक करत समाजाच्या सर्वंकष उत्कर्षासाठी कटिबद्ध राहण्याचा आज आपण निश्चय करूया आणि देशातील लोकशाहीला अधिक मजबूत बनवूया असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.मंदा बी.मोरे मॅडम,काळे सर,पाल सर,पाझारे सर,दासरवार सर,येरमे मॅडम,करवटकर मॅडम,पोडे मॅडम, अनिरुद्ध आवळे, मनोहर कवाडे, सरस्वता पाटील आदींसह मोठ्या संख्येने चिमुकल्या विद्यार्थींनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here