🔸महा अंनिस व मूकनायक विचार मंचाचा सामाजिक उपक्रम
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
वाशिम(दि.28नोव्हेंबर):-येथे भारत देश हा विविध जाती, संप्रदाय, व संस्कृतीने नटलेला देश आहे. जगातील सर्व प्रमुख धर्म व हजरो जाती व उपजाती, शेकडो बोली भाषा,राहणीमान व आहार विहाराच्या पध्दती देखील भिन्न परंतु या देशाला संविधानाने एक संघ केले आहे. भारत देशासाठी हि खुप मोठी उपलब्धी आपल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानातून साध्य झाली आहे. याला मूर्त रूप देण्याचं महान कार्य महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अखंड भारताच्या उभारणीसाठी दुरदृष्टीने तीन वर्षांच्या अथक परिश्रमांतून हे संविधान आज जगात जणूकाही ताठ मानेने उभे आहे.
सव्वीस नोव्हेंबर संविधान स्विकृती दिन संपुर्ण भारतभर विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो याचाच एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मूकनायक विचार मंच वाशिम च्या पुढाकारतून सर्व संविधान प्रेमी, संत साहित्याची आवड असणारे, वारकरी संप्रदाय, आदिवासी समाज बांधव, मुस्लिम बांधव आणि एकूणच सर्व जाती धर्माचे महिला पुरूषासह संविधानाचे अभंग पोवाडा व भारूड म्हणत व हातात संविधानावर आधारित घोषणा फलक घेऊन रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शतपावली खेळत भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेईजाणता जाणता जाणसी स्वतः ला ,तव अस्तित्वाला अर्थ येई अशा विविध अभंगाने संविधानाचा गजर करत पाटणी चौक मार्गे महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी भारतीय संविधानाचे महत्व विषद करून कुमारी यशोमती गजानन धामणे या बालिकेने संविधान प्रास्ताविकीचे सामुहिक वाचण केले.
या रॅली मध्ये सत्यशोधक समाज संघटना चे राज्य अध्यक्ष के. एन.हरिदास, प्रल्हाद पौळकर, गजानन धामणे, महिला संरक्षण अधिकारी बी. बी. धनगर,महिला व बालकल्यान समिती चे विनोद पट्टेबहादुर, बालाजी गंगावणे,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते अनंतराव तायडे, मुकनायक विचार मंचाचे अध्यक्ष राजीव दारोकार, सुखदेव काजळे, नीलेश भोजणे, अंनिसचे दतराव वानखेडे, शेषराव मेश्राम, कुसुमाताई सोनुने, संगिता सावळे, सुनील सावळे, नाजुकराव भोंडणे, सुनील वैद्य, बाबाराव गोदमले, दशरथ मोरे,रमेश मोरे, ग्यानुजी भोंडणे, अशोक महाजन, शेख अन्सार, संतोष भगत, सुरेश शृंगारे, उध्दव वानखेडे, विश्वनाथ इंगोले, एड.प्रशांत इंगळे, एड.डाॅ. मोहन गवई, भारत खंदारे, नामदेव सभादिंडे, संतोष खडसे, भास्कर गायकवाड, कांशीराम गायकवाड, शिवाजी गायकवाड, यशवंत खडसे, सिद्धार्थ भगत, वंदना गायकवाड, विश्वनाथ पाईकराव, मदन भगत, गौतम खंदारे, बबन खरात, शंकर गायकवाड, समाधान सावंत, सुरेश वानखेडे, कचरू खडसे, लोडजी भगत,सदाशिव राऊत आदी सहभागी होते. संविधान रॅली चे प्रास्ताविक राजु दारोकार तर आभार नाजुकराव भोंडणे यांनी केले