✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.28नोव्हेंबर):- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान दिनाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग, एन. एस. एस. विभाग, एन. सी. सी. विभाग तथा तालुका विधि सेवा समिती, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्निधा कांबळे, विशेष उपस्थिती म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, प्रमुख अतिथी म्हणुन मान. एस. डी. चक्कर साहेब, दिवाणी न्यायाधीश ( क. स्तर) तथा अध्यक्ष तालुका विधि सेवा समिती, ब्रम्हपुरी तसेच मान. आर. एन. पाठक, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्याय दंडाधिकारी, ब्रम्हपुरी तसेच तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, तालुका बार असोसिएशन, ब्रम्हपुरीचे अध्यक्ष श्री. हेमंत उरकुडे यांनी संविधानातील कलम 39- अ याविषयी भाष्य केले. अॅड. श्री. दिलीपकुमार एस. माटे, तालुका बार असोसिएशन, ब्रम्हपुरी यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांशी संबंधित कलम 14 ते 18 याविषयी भाष्य केले. अॅड. श्री. आशिष गोंडाणे यांनी कलम 21 याविषयी माहिती दिली. अॅड. श्री. अतूलकुमार खोब्रागडे यांनी संविधानातील कलम 19 वर भाष्य केले. तर अॅड. नंदेश्री तुफान अवताडे यांनी कलम 15(6), 16(6) ई. डब्ल्यू. एस. आरक्षण यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अक्षय बरडे, मनीषा तलमले या विद्यार्थ्यानी तसेच प्रा. सरोज शिंगाडे यांनी संविधानावर आधारित आपले विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुफान अवताडे यांनी तर आभार प्रा. डॉ. लोकेशकुमार नंदेश्वर यांनी मानले . या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच तालुका विधि सेवा समिती ब्रम्हपुरीचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.