Home महाराष्ट्र किसनराव शिंदे यांचा सपत्नीक सत्कार

किसनराव शिंदे यांचा सपत्नीक सत्कार

202

✒️सिद्धार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.28नोव्हेंबर):- श्रीराम मंगल कार्यालय, उमरखेड येथे भव्य दिव्य सत्कार सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यामध्ये एकूण सोळा व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पुरोगामी युवा ब्रिगेड व सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार देऊन या सन्माननीय व्यक्तीचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये उमरखेड येथील नामवंत व्यक्तिमत्व असलेले सुदर्शनप्रेसचे मालक उद्योजक श्री किसनराव माधवराव शिंदे व सौ. पुष्‍पाबाई किसनराव शिंदे व त्यांची नात चिमुकली कु. आराध्या महेश शिंदे यांचा डॉ. विजयराव माने कृषी शास्त्रज्ञ व बाळासाहेब घुईखेडकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र पुष्पहार देऊन या उभयतांचा गौरव करण्यात आला. खरोखर काकाश्री गौरवास पात्र आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व अतिशय उत्तम आहे.

शिक्षण6वा वर्ग आईवडील पूर्णतः निरक्षर शिक्षण घेण्याची इच्छा असूनही पुस्तकाअभावी पैस्याअभावी शिक्षण घेता आले नाही. 1967 ला शाळा सोडली. दोन वर्षे शेतीत काम केले. नंतर मित्राच्या माध्यमातून प्रेसवर काम करण्यास 1969 ला सुरुवात केली. प्रथमता प्रेसवर60 रुपये महिन्यावर काम केले. अनेक चढ उतारपाहिले. पार्टनरशिफ्ट मध्ये काम केले. पण यश मिळाले नाही. भांडवलाचा अभाव तरी स्वतःचा प्रेस टाकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पूर्णतः अनेकजाती धर्माचे मित्र परिवारांनी सहकार्य केले. त्यात माता पित्यापेक्षा श्रेष्ठअस व्यक्तिमत्व म्हणजे माणसातला देव ज्या कर्तव्यातून पाहतो तो देव माणूस म्हणजे सखारामजी झांबरे सर तो माझ्यासाठी व्यक्ती नसून ते माझ्यासाठी व कुटुंबासाठी ईश्वररूपी देवच आहेत असे सहकार्य स्व. झांबरे सरांनी केले.

त्यामुळेच मी व माझी सुदर्शनप्रेस उभीआहे. प्रेस चालवताना अनेक संकट आली पण कर्तव्यात कधीही कसूर ठेवला नाही. ग्राहकांसाठी योग्य दर योग्यवेळ व प्रामाणिकपणा माझा आजही कायम आहे. सर्वात जास्त आनंदमला प्रेसवर काम करण्यात वाटतो. असे त्यांनी सत्काराला उत्तर दिले. मी स्व.भाऊसाहेब माने स्व.नारायणराव वानखेडे स्व.जेठमलजी माहेश्वरी स्व.पंजाबराव माने यांचा मला सहवास लाभला त्यांचा आशीर्वाद मला मिळाला. मी ग्राहकाला देव मानतो. डॉ. विजयराव माने यांनी माझी स्वर्गीय सत्यशोधक भाऊसाहेब माने पुरस्कारासाठी निवडकेल्याबद्दल त्यांचा मी खूपखूप आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here