Home Breaking News नातेचं ठरले वैरी! बीड जिल्ह्यात सलग 3 दिवसात 3 खून; खाकीच्या धाकावर...

नातेचं ठरले वैरी! बीड जिल्ह्यात सलग 3 दिवसात 3 खून; खाकीच्या धाकावर प्रश्नचिन्ह

320

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.27नोव्हेंबर):- जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून खाकीच्या धाकावर प्रश्न निर्माण करण्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात सलग 3 दिवसांमध्ये 3 खूण झाले आहेत. वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे कौटुंबिक वादातून 16 वर्षीय पुतण्याची काकानेच कोयत्याने हल्ला करत खून केल्याची घटना घडली आहे. दुसरी घटना बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली आहे. ऊसतोड कामगाराच्या 16 वर्षीय मुलीची अत्याच्या मुलीने तिच्या मित्राच्या मदतीने विहिरीत ढकलून हत्या केली आहे.

तर तिसरी घटना बीड तालुक्यातील मुळूकवाडी येथे घडली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी, 80 वर्षीय बळीराम मसाजी निर्मळ यांची, सख्या पुतण्याने खून करत चुलतीला देखील गंभीर जखमी केलं आहे. याप्रकरणी बीडच्या वडवणी, दिंद्रुड, नेकनूर पोलीस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान तर या तिन्ही घटना गेल्या 3 दिवसात घडल्या आहेत. त्यामुळं खाकीच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर या तिन्ही घटनेत नातेच वैरी झाल्याचं समोर आलं आहे. या तिन्ही घटनेत नात्यातील कलह टोकाचे पाऊल उचलत असल्याच दिसत आहे.

चातुर्वण्य व जातिभेद मानवनिर्मित उपद्व्याप!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here