Home महाराष्ट्र प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान म्हणजेच भारतीय संविधान – प्रा.ए.ए.पटेल

प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान म्हणजेच भारतीय संविधान – प्रा.ए.ए.पटेल

93

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.27नोव्हेंबर):- प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि स्वाभिमान वाटावा असे भारतीय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीने निर्माण केलेले आहे. संविधानामुळेच या विविधतेने नटलेल्या भारतीय देशांमध्ये एकता, अखंडता निर्माण झाली आहे. असे गौरवोद्गार प्रा. ए. ए. पटेल यांनी काढले. ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे येथे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत आयोजित केलेल्या संविधान दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व या विषयावर ते बोलत होते. महाविद्यालयामध्ये संविधान दिनानिमित्त उंडाळे गावातून संविधान रॅली काढण्यात आली व त्यानंतर संविधानाचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. बी. पाटील यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी संविधान सभेची निर्मिती व कशाप्रकारे संविधान निर्माण झाले? याचा इतिहास सांगितला. त्यानंतर प्रा. प्रदीप चोपडे यांनी संविधानाचे आपल्या देशामध्ये किती महत्त्व आहे याविषयी विवेचन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.जाविद शेख होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी संविधानातील विविध तरतुदी कशा आत्मसात कराव्यात याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार प्रा. भिसे सर यांनी मांडले. सूत्रसंचालन कु.नीलम शेटे यांनी केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

महागाईचा विस्फोट… सरकार दरबारी नसलेल्या आणि सामान्यांच्या पाचवीला पुजलेला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here