Home चंद्रपूर नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संविधान दिन

नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संविधान दिन

132

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.27नोव्हेंबर):- येथील नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधान व भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करीत अभिवादन केले.
याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
यासोबतच २६/११ च्या क्रूर दहशतवादी हल्यात हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात आली.

यावेळी भाजपाचे पिपरी गावचे माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य पारस पिंपळकर यांनी, बाबासाहेबांनी संविधान दिल्यामुळे आपल्या भारत देशात आज स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय नांदत आहे. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे पवित्र संविधान भारत देशाला अर्पण केले मि संविधानाला व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो, असे प्रतिपादन केले.

यावेळी माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य (पिपरी) पारस पिंपळकर,घुग्घुस माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, कुसुमताई सातपुते, संजय तिवारी,भाजप नेते बबलू सातपुते,सुरेंद्र जोगी, मनमोहन महाकाली, पौर्णिमा कांबळे, पार्वती देहारे, शारदा झाडे, वैशाली भालशंकर,हर्षाली फुलझेले,छाया पाटील, सुनीता पाटील, सुनंदा लिहीतकर, निशा उरकुडे, लता आवारी, प्रीती धोटे, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, उमेश दडमल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here