✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.27नोव्हेंबर):-जि. प. उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेत संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आला.भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे“संविधान सम्मान दिन” कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले.याठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. प्रसंगीच शाळकरी चिमुकल्यांशी संवाद साधला.
आजच्याचं दिवशी २६ नोव्हेंबर इ.स. १९४९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून देशाला अर्पण केली. व पुढे २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली. आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारतात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून आज देशभर शासकीय, राजकीय तसेच सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केल्या जातात.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही आज जिल्ह्यात सर्वत्र बूथ स्तरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्याठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केल्या जात आहे. तर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आणि रॅलींचेही आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्ये आपल्याला प्रदान केली आहेत.
या मूल्यांची जपणूक करत समाजाच्या सर्वंकष उत्कर्षासाठी कटिबद्ध राहण्याचा आज आपण निश्चय करूया आणि देशातील लोकशाहीला अधिक मजबूत बनवूया!पुनःच्छा सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.मंदा बी.मोरे मॅडम,काळे सर,पाल सर,पाझारे सर,दासरवार सर,येरमे मॅडम,करवटकर मॅडम,पोडे मॅडम, अनिरुद्ध आवळे, मनोहर कवाडे, सरस्वता पाटील आदींसह मोठ्या संख्येने चिमुकल्या विद्यार्थींनी उपस्थित होत्या.