Home महाराष्ट्र जि.प.प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे संविधान दिन साजरा

जि.प.प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे संविधान दिन साजरा

127

✒️प्रतिनिधी धरणगाव(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.26नोव्हेंबर):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे संविधान दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम गावातून संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी अनेक घोषणा दिल्या.

त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील उपशिक्षक संजय गायकवाड व वैशाली वाणी यांनी केले.

नंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन श्री.संजय गायकवाड यांनी केले त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी वाचन केले. तसेच संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.अशा प्रकारे विविध कार्यक्रमांनी संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here