✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.26नोव्हेंबर):-महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांचे आराध्यदैवत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी याचा रथोत्सव सोहळा गुरुवार दि. 24 नोव्हेंबर रोजी लाखों भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने पार पडला.यावेळी आलेल्या भाविक भक्तांनी ” सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं” “नाथाच्या घोड्यांचं चांगभलं ” “नाथाच्या हत्तीचं चांगभलं” “सिध्दनाथाच्या नावानं चांगभल”च्या जयघोषात गुलाल खोब-याची उधळण करीत परिसर दुमदुमून निघाला.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथोत्सवाच्या नगरप्रदक्षीणेच्या मिरवणुकीने श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता देव दिवाळी दिवशी दोन वर्षाच्या कोविड निर्बंधांनंतर उत्साही वातावरणात संपन्न झाली असली तरी दोन वर्षानंतर होत असलेल्या यात्रेला पाच ते सात लाख भाविकांची उपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी केली होती मात्र यात्रेत जास्त गर्दी होणार म्हणून अनेक भक्तांनी जाणे टाळल्याने यात्रेत म्हणावी तशी अंदाज व्यक्त केलेली गर्दी झाली नसल्याने व्यापारी वर्गात नाराजी सूर दिसून येत होता.
कोविड संक्रमनामुळे गट दोन वर्षांपासून रथ प्रदक्षिणा व यात्रा भरली नव्हती फक्त विधीवत पुजा आर्चा झाली होती.यंदा मात्र दोन वर्षाची कसर भरुन निघणार या आशेने व्यापारी वर्गाणी, मिठाई दुकान, गुलाल खोबरे, कटलरी, मनोरंजक खेळणी , आदी व्यावसाईक यांनी धंदा जोरात होईल म्हणून माल भरला होता मात्र अपेक्षा प्रमाणे भाविक आले नसल्याने पहिलीच यात्र फेल जात असल्याने व्यापारी वर्गात नाराजी दिसत होती.
म्हसवड यात्रेतील मोफत औषधे उपचार मोफत देताना डॉकटर
दीपावली पाडव्याच्या अभंग्यसनाणाने घटस्थापना, उभे नवरात्र, नगरप्रदक्षीणा, हळदी, व दिवाळी मैदान असे पारंपारिक पध्दतीने १२ दिवस उत्सव होतो तुळशी विवाह दिवसी श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला या विवाहाची वरात म्हणजे रथोत्सवाची नगरप्रदक्षीणा आज देवदिवाळी दिवसी होत असते एक महिना सुरु असलेला हा आगळा वेगळा पारंपारिक पध्दतीने शाही विवाह सोहळ्याची सांगता रथोत्सवाने होत असते आज या सोहळ्यास तिन ते साडे तिन लाख भाविकांची उपस्थिती लावली होती.
दुपारी एक वाजता रथाचे मानकरी श्रीमंत राजेमाने परिवाराचे नैवद्य मंदिरात नेण्यात आला त्यानंतर माण तहसीलदार श्रीशैल्य वट्टे, मुख्याधिकारी सचिन माने, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, दहिवडी नगराध्यक्ष सागर पोळ, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सावंत, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब माने, आ निलेश लंके यांचे बंधू अतुल लंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, चंद्रकांत केवटे, सोमनाथ केवटे, बबन आबदागिरे, सचिन लोखंडे, आदी उपस्थित होते राजेमाने यांच्या निवासस्थानावरुन ढोलाच्या तालात श्रीमंत अजितराव राजेमाने, गणपतराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, शिवराज राजेमाने, सयाजीराव राजेमाने, हि सर्व मंडळी त्यांच्या निवासस्थानावरुन वाजत गाजत मंदिरात आले तेथून उत्सव मुर्ती पालखी मध्ये ठेवून रिंगावण पेठ मैदानावर नगरप्रदक्षिणेच्या तयारीने सजवलेल्या रथावर विविध रंगी बिरंगी मानाची व नवसाचा निशाने, नारळाची तोरणे, खोबर्याच्या वाट्याची माळ पेढ्यांसाठी माळानी सजलेल्या रथा मध्ये उत्सव मुर्ती ठेवताच श्रीच्या जय घोषात ढोलाच्या शेडयाने गुलाल खोबर्याच्या उजळणी रथ दुपारी साडे तिन वाजता नगरप्रदक्षीणेस सुरुत झाली.
माण गंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रथ मार्ग बदलून बाय पासवरुन बाजार तळ, पालिका इमारत, महात्मा फुले चौक बस स्थानकावरून सातारा पंढरपूर रोडवरून वडजाई ओढ्यात रात्री नऊ वाजता रथ आल्यावर देवी वडजाई हिला श्री सिध्दांत जोगेश्वरी देवीच्या वतीने साडी चोळी अर्पण करून नवसाचा मुले रथावर झेलण्याची नवस अनेकांनी फेडले यावेळी या परिसरात हा आगळा वेगळा कार्यक्रम पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती वडजाई ओढ्यातुन ज्ञानवर्धिनी हायस्कूल मार्गावरून लक्ष्मी व मरीमाता देवीला साडी चोळी आहेर दिल्यानंतर रथ पुन्हा यात्रा पटांगण येथे रात्री उशिरा उभा करण्यात आला.तर किरकोळ चोरी आणि मारामरीच्या घटना वगळता यात्रा शाततेत पार पडली परंतु यात्रेसाठी लागणारी जागा अपुरी असल्यामुळे आणि दुकानांना जागा न मिळाल्याने व्यापारी आणि भाविकाच्यामध्ये तीव्र नाराजी होती याचा परिणाम पुढील यात्रेत होण्याची शक्यता भाविक आणि नागरिक बोलून दाखवत होते.