🔸वडाळा( पैकू) येथे वीर बाबुराव शेडमाके यांचा 165 वा शहिद दिन व समाज प्रबोधन
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि 24नोव्हेंबर):- देश स्वतंत्र होऊन बराच कालावधी लोटला असूनही बाकी समाजाच्या तुलनेत आदिवासी समाज प्रगत झाला नाही तेव्हा तरुण तरुणीने शिक्षण क्षेत्रात प्रगती करून समाजाची उन्नती करून समाजाला नवी दिशा द्यावी व आदिवासी समाजाची संस्कृती जतन करून जगासमोर वेगळी ओळख निर्माण करून द्यावी असे प्रतिपादन निरंजन मसराम( डी लिट,यु एम ए, राष्ट्रीय अध्यक्ष गोडवाना संग्राम) यांनी वडाळा (पैकू) येथील 1857 च्या स्वातंत्र संग्रामात शहीद वीर बाबुराव शेडमाके शहीद दिन व समाज प्रबोधन कार्यक्रमात बोलताना केले.
दाई जंगो रायताड गोंडीयन बहुद्देशीय संस्था व आदिवासी एमपलाईज फेडरेशन तथा आफ्रॉत संघटना तालुका शाखा चिमूर च्या वतीने 1958 च्या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेले वीर बाबुराव शेडमाके यांचा165 वा शहीद दिन व आदिवासी प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात महापूनेने करण्यात आली. दुसऱ्या दिवशी गोंडी धर्म ध्वजारोहण डाँ आनंद किनाके यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे उदघाटन व मार्गदर्शन श्रीधर नैताम, डाँ राजू मडावी, डाँ आनंद किन्नके यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून निरंजन मसराम पंजाब पुरके, प्रकाश मरसर्कोले, राजकुमार मसराम, डाँ निलकंठ मसराम,मोतीराम मडावी, शामराव उईके, नामदेव किनाके, खुशाल तीळकाम, विलास कोराम, नानाजी उईके, अशोक आडे, बालाजी कोयचाडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. यानंतर दुपारी भव्य दिव्य संपूर्ण गावातुन मिरवणूक काढण्यात आली. यात शहीद वीर बाबुराव शेडमाके अमर रहे, जय सेवा जय जोहार, च्या घोषणा देत वाजत गाजत ढोल ताष्याच्या निनादात परिसराला दणाणून सोडीत संपुर्ण गावातून मार्गक्रमण करीत आयोजन स्थळी आली. या रलीत समाजातील महिला पुरुषांनी व बालगोपाळणीनी आकर्षक एक रंग वस्त्रे परिधान करून नागरिकांचे लक्ष वेधले.
यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रात्रोला भव्य गोंडी ढेमसा पारंपरिक रेकारडींग नुत्यचा कार्यक्रम घेण्यात आला.यात तालुक्यातील जांमनी, कोलारा, महालगाव, भिवापूर, मोकाळा, चिमूर, वडाळा पैकू येथील तरुण तरुणी नुत्य मंडळाने भाग घेतला. या कार्यक्रमाचे उदघाटन विलास कोराम, नंदू सोयाम, डाँ दिवाकर कुंभरे, इंदूताई येरचे, आशा मडावी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील कोयचाडे, प्रकाश मसराम, प्रकाश कोडापे, देविदास धुर्वे, विलास कोयचाडे, भक्तदास धुर्वे, मोतीराम मडावी, नंदू सोयाम, वरकळे सर, देवानंद मेश्राम, जीवन येरमे, पुरुषोत्तम कुंभरे, रोहित मडावी, हर्षल मसराम, राजकुमार मसराम, आशा खुशाल मडावी, बेबी कोडापे, मनीषा मसराम, साधना नैताम, रेखा धुर्वे, वर्षा कोयचाडे, वृंदा कोयचाडे, उषा मसराम आणि गोंडीयन बहुद्देशीय संस्था व आदिवासी एमपलाईज फेडरेशन च्या सर्व सभासद कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.