✒️फलटण(पुरोगामी न्युज नेटवर्क)
फलटण(दि.24नोव्हेंबर):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची फलटण तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष पंकज धायगुडे पाटील यांची उपस्थिती होती. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली हजारो पत्रकार संघटनेत सहभागी होत आहेत.
ही संघटना पत्रकारांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी कायम कार्यरत असल्याचे जिल्हाध्यक्ष पंकज धायगुडे पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची फलटण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये फलटण तालुका अध्यक्षपदी संतोष बिचुकले, तालुका उपाध्यक्ष उमेश काकडे, कार्याध्यक्ष रियाज तांबोळी, सचिव विजय गाडे, खजिनदार सुनील मारूडा, संघटक शफिक शेख, सहसंघटक सरफराज शेख तर सदस्य म्हणून डॉक्टर संतोष सोनवलकर व अमोल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
https://www.purogamisandesh.in/news/62282
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.