Home खेलकुद  राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

138

🔸मैदानाचे काम दिवस-रात्र सुरु

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने व परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक ३ ते ६ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ४९ वी कुमार- कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हि स्पर्धा शहरातील कोद्री रोडच्या मोकळ्या जागेत संपन्न होणार असून त्यासाठी तब्बल ६ मैदाने तयार करण्यात येत असून त्यासाठी क्रिडाप्रेमी मुख्याध्यापक माणिक नागरगोजे दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्या मैदानास स्व.माणिकराव गुट्टे क्रिडानगरी हे नाव देण्यात येणार आहे.

नियोजित कबड्डी स्पर्धेत राज्यभरातून कुमार-कुमारींचे प्रत्येकी २५ प्रमाणे एकूण ५० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे जवळपास ८०० खेळाडूंची वाहतुक, निवास व भोजनाची तयारी आयोजकांनी केली आहे. हे सर्व सामने सायंकाळी प्रकाश झोतात खेळले जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या असून त्यांना विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शहरात यापूर्वीही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या आर्थिक मदतीने जिल्हास्तरीय कबड्डी आमदार चषक स्पर्धा उत्साहात संपन्न झाली होती. त्यामुळे राज्यभरातील गुणी व मेहनती कबड्डी खेळाडूंना भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानने स्पर्धा आयोजनात पुढाकार घेतला असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव अॅड.मिलिंद क्षिरसागर यांनी सांगितले आहे.

चढाई आणि पक्कडचा थरार निर्माण करणा-या कबड्डी हा सांघिक खेळ जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात फार लोकप्रिय आहे. गावोगावी यात्रा-जत्रांमध्ये कबड्डीचा थरार पाहाण्यास मिळतो. त्यामुळे नियोजित राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची खेळाडूंसह क्रिडाप्रेमींना उत्सुकता लागली आहे.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

दरम्यान, नियोजित भव्य कबड्डी स्पर्धेची तयारी यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ व रासपचे पदधिकारी यांच्यासह तालुक्यातील क्रिडा शिक्षक विशेष मेहनत घेत आहेत.

गोवरचा विळखा वाढतोय….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here