✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.22नोव्हेंबर):-“डाॕ.बाबासाहेबांना अपेक्षित संविधानाची आमलबजावणी जेव्हा होईल, तेव्हा भारत बौद्धमय झालेला असेल ! ” असे उद्गार धम्मभूषण तथा चार्वाकवनाचे संचालक अॕड.आप्पाराव मैन्द यांनी दहिसावळी येथील संविधान घराच्या स्थापने संबंधी आयोजित कार्यक्रमात काढले.ते पुढे म्हणाले की, डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धशासनाच्या सर्व तरतुदी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या आहेत .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहिसावळीचे पोलीस पाटील दिगंबरराव ठाकरे होते.तर संविधन घराची संकल्पना दलित मित्र एस.टी.भगत यांनी विशद केल्यानंतर भीमराव भवरे, महेंद्र कावळे ,से.नि.मुख्याध्यापक चौधरी सर पोहंडूळ,श्रीरामनवार सर यांची याप्रसंगी समयोचचित भाषणे झालीत.
संविधान घर योजनेचे प्रचारक अॕड.अप्पाराव मैंद यांनी संविधान घराचे नवनियुक्त संचालक आणि उपसंचालक यांचेकडे संविधानाची प्रत दिली आणि संविधान घराचे रीतसर स्थापना झाली असे जाहीर केले.
या सभेचे उत्कृष्ट आयोजन सरपंच संतोषराव कोरके आणि राजुभाऊ इंगळे यांनी केले होते.सुत्रसंचालन राजूभाऊ इंगळे यांनी केले तर आभार श्रीरामनवार यांनी मानले.या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.