Home महाराष्ट्र धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे शिफारस करावी-धनगर ऐक्य परिषदेची मागणी

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे शिफारस करावी-धनगर ऐक्य परिषदेची मागणी

396

✒️चांदू आंबटवाड(नायगाव ता.प्रतिनिधी)

नायगाव(22नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा प्रलंबित प्रश्न म्हणजे आरक्षण व त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनगर व धनगड हा एकच शब्द असुन केवळ स्पेलिंग मिस्टेक मुळे गेली 75 वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती पासून वंचित राहावे लागत आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल, छतीसगड या पाच राज्यातील 12 जातीच्या हिंदी व इंग्रजी भाषेच्या उच्चाराच्या शब्दाला दुरुस्तीचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला आहे.

त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या धनगर व धनगड या शब्द दुरुस्तीचा निर्णय तातडीने घेऊन धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत सामावेश करावा अशी मागणी धनगर ऐक्य परिषदेचे नायगाव ता.समन्वयक श्री चंद्रकांत महादाळे यांनी नायब तहसीलदार श्री संजयकुमार देवराये यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी गणेश बिस्मीले, मल्लु देवदे, संभाजी गुंठे, तानाजी देवदे, देविदास देवदे,पोचु शेट्टे, गोविंद शिगळे,बालाजी महादाळे, तुकाराम पवार व देविदास पवार आदी हजर होते.

स्वयंघोषित साईबाबांचे अवतार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here