Home Breaking News गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणा-यांवर ब्रम्हपुरी पोलीसांची कार्यवाही

गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणा-यांवर ब्रम्हपुरी पोलीसांची कार्यवाही

227

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 21नोव्हेंबर):-ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा भुज से एकारा रोड दरम्यान अवैधरीत्या गोवंश जनावरे वाहतुक होत असल्याचे खात्रीशिर खबरेवरून ब्रम्हपुरी पोलीसानी नाकाबंदी करून अवैध जनावरांची वाहतुक होत असलेले दोन आयसर ट्रक वाहन ताब्यात घेवुन सर्व गोवंशाना गोरक्षण केंद्रात जमा केले. आरोपीविरोधात पोस्टे ब्रम्हपुरी येथे आणुन गुन्हा नोंद केला.

जिगरबाज…!

दि. 21/11/2022 रोजी रात्रो 1 वा. ते 6 वा. दरम्यान ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा भुज ते एकारा रोड दरम्यान दोन आयसर वाहनात अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतुक होत असल्याचे खात्रीलायक माहीती वरून सदर रोडवर पोलीसांकडुन नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान 2 आयसर ट्रक क्रमांक MH 40CD 4917 व MH 40 CD 4013 लागोपाठ आल्यावर त्या वाहनांना थांबवून वाहनाची झडती घेतली असता दोन्ही वाहन मिळुन एकुण 50 गोवंश जनावरे किं. 5,00,000/रु जनावरांसह ट्रक कि. 24,00,000/ रु असा एकूण 29,00,000/ लाख रू / या मुददेमाल आरोपींच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला.

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!

अवैधरीत्या वाहतुक करणा-या एकुण 6 आरोपीविरूध्द कलम 5 (अ) (ब) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम 11 (डी) (एफ) प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम, सहकलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम 83/177 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सर्व जनावरे गोविंद गौशाळा, हळदा ब्रम्हपुरी येथे दाखल करण्यात आलेले आहे.

भारत तैवान मैत्री India-Taiwan Friendship पर्वास सुरवात!

सदरची कार्यवाही श्री मल्लिकार्जुन इंगळे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपुरी तसेच पोलीस निरिक्षक रोशन यादव पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुरेंद्र उपरे, पोउपनि राजेश उंदीरवाडे, नापोशी तेजराम जनबंधु, पोहवा हरीदास सुरपाम, पोशी राजेश्वर धंदरे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि सुरेंद्र उपरे करीत आहे.

’भारत जोड़ो’ यात्रा : जाना किधर है? मंजिल कहाँ है??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here