✒️चामोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चामोर्शी(दि.20नोव्हेंबर):–स्थानिक केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयात बीकॉम तृतीय वर्षात शिकणारी कु अर्चना सातार हिची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोंडवाना विद्यापीठ खोखो संघात निवड झाली.
सोनापूर या लहान गावात राहणारी अर्चना सातार ही महाविद्यालयात सोनापूर वरून रोज सायकल ने येते हेच तिच्या फिटनेस चे रहस्य आहे असा विश्वास प्रशिक्षक डॉ महेश जोशी यांनी व्यक्त केला .
https://www.purogamisandesh.in/news/62131
हरिसिंग गौर विद्यापीठ सागर मध्यप्रदेश येथे नुकत्याच या आंतर विद्यापीठ खोखो स्पर्धा संपन्न झाल्यात यामध्ये गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे प्रदर्शन समाधानकारक राहिले .
अर्चना सातार हिच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर ,शारीरिक शिक्षण संचालक डॉ महेश जोशी आणि यशोदीप संस्था गडचिरोली चे अध्यक्ष अरुण हरडे ,संस्थेच्या सचिव डॉ स्नेहा हरडे यांनी अभिनंदन व्यक्त केले असून अर्चना च्या भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि खेळाडू विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.