✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.20नोव्हेंबर):-लाखो भक्तांचे दैवत म्हणून पाहिले जात असलेल्या सिध्दनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांना वाहतूकीची, दर्शनाची किंवा पार्किंग बाबत कोणतीच अडचण येणार नाही याची व्यवस्था पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आली आसुन यात्रेला येणाऱ्या भाविकांनी व म्हसवडच्या नागरीकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समिर शेख यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांसी बोलताना व्यक्त केले.
सिध्दनाथ व जोगेश्वरी यात्रेच्या अनुशंगाने होणारी भाविकांची गर्दी , येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी दहिवडी, शिंगणापूर व मायणीकडुन येणारी वाहने पोळ पंपाच्या पाठीमागील बाजूस, मागणीवरून आलेली काही वाहने मायणी चौकात पार्किंगची सोय करण्यात आली तर पंढरपूर व माळशिरस वरुन आलेले माळशिरस चौकात पार्किंगची तर आटपाडी वरुन आलेली विरकरवाडी चौकात जांभुळणी पानवणच्या बाजूकडून आलेली मेघा सिटी परिसरात उभी राहतील.
यात्रेच्या दरम्यान कोठे हि गर्दी होणार नाही यासाठी १५० च्या दरम्यान पोलीस कर्मचारी , १५ अधिकारी, ५० होमगार्ड, अॅकाॅडमीचे युवक ५०, दंगाकाबू पथक अशी फौज यात्रा परिसरातील दोन किलो मीटर अंतरावर तैनात असणार आहे यात्रा पटांगणात दोन वॅच टॉवर, तर मंदिर परिसरात एक वॅच टॉवर उभारले जाणार आहेत यात्रेत होणाऱ्या चोरी, पाकिटमारी, लुटमार, दादागिरीने हप्ते वसुली, दोन नंबर व्यावसायिक यांचेवर पोलिसांची नजर असणार आहे.
त्यामुळे नागरीकांनी सहकार्य करावे व शांततेत दर्शन घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन एसपी समिर शेख यांनी केले यावेळी देवस्थान कमिटी व पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी सपोनि राजकुमार भुजबळ, पीएस आय विशाल बागल, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन महेश बुरुंगे, व्हा. चेअरमन वैभव गुरव, हरिभाऊ गुरव, माजी नगरसेवक राजाराम गुंजाणे, सालकरी गणेश बालघट्टे,आदी उपस्थित होत