Home महाराष्ट्र विकास विद्यालय अर्हेरनवरगाव येथिल विद्यार्थीनी कु. मुस्कान महेश पिलारे हिचे नवोदय परीक्षेत...

विकास विद्यालय अर्हेरनवरगाव येथिल विद्यार्थीनी कु. मुस्कान महेश पिलारे हिचे नवोदय परीक्षेत सुयश

624

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 20 नोव्हेंबर):-विकास विद्यालय अर्हेरनवरगाव येथिल विद्यार्थीनी कु. मुस्कान महेश पिलारे (भालेश्वर)ही वर्ग 5 वी मध्ये सत्र 2021 -2022 झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिची वर्ग 6 वी करीता जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. तसेच वर्ग 5 वी च्या सत्र 2021 -2022 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. टी. सहारे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक एस डी मेश्राम, पालक महेश पिलारे हे होते.

सदर कार्यक्रमात कु. मुस्कान महेश पिलारे हिला विद्यालयाच्या वतीने गौरव चिन्ह भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री सहारे सर यानी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षक श्रीहरी ठेंगरे यांनी केले या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद ,शिक्षिका ,विद्यार्थी व विद्यार्थ्यीनी उपस्थित होते.

कु. मुस्कान ने तिच्या या यशासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. विद्यार्थीने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. टी. सहारे , शिक्षकवृंद, आई- वडील व शाळेच्या व्यवस्थापक सर या सर्वाना दिले. तसेच गावातील प्राथमिक शाळेचे शिक्षक भारत वाट भालेश्वर, शिक्षक अनिल बावनकर भालेश्वर यांचेही मार्गदर्शन लाभले असे सांगितले. एका लहानश्या गावातील चिमुकलीने आपल्या यशातून सर्वांचं मन आकर्षून घेतलं. तसेच गावातील लोकांकडून, मित्र-मैत्रिणीकडून सर्वत्र कु. मुस्कान चे अभिमानास्पद कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here