Home महाराष्ट्र ने.हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा...

ने.हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

270

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18नोव्हेंबर):-पूर्व विदर्भातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरीतील अग्रनामांकीत ने.हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.नुकतेच विद्यालयात एकलव्य अकॅडमी यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ’12 वी नंतरच्या वेगळ्या वाटा’ या विषयावर एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा प्राचार्य जी.एन.रणदिवे सर यांचे अध्यक्षतेखाली तथा उपप्राचार्य के.एम.नाईक सर ,पर्यवेक्षक घोरुडे सर, प्रा.पी.आर. जिभकाटे सर, वदनलवार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

एकलव्य अकॅडमी यवतमाळ हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नियोजनबद्ध कार्यामुळे अल्पावधीतच नावारुपास आले आहे. सदर कार्यशाळेला अकॅडमी तर्फे एकलव्यचे सह संस्थापक आकाश मोडक सर तथा अंकुश गांग्रेड्डीवार सर व परमेश्वर जोगदांडे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे महत्व, उज्वल भविष्यासाठी 21 व्या शतकातील कौशल्ये, भारतातील सर्वोच्च शिक्षण देणारी केंद्रीय विद्यापीठे व संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फेलोशिप तथा लॉ, फाईन आर्ट, फिल्म मेकिंग, पत्रकारिता, हॉटेल मॅनेजमेंट ,बिझनेस मॅनेजमेंट इ. मधील पदवी शिक्षण व त्यातून घडणारे करिअर या सर्व बाबींवर विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या उज्वल भविष्य संदर्भात सकारात्मक होवून मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाने व स्वपरिश्रमाने आपले करिअर घडवावे असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य जी.एन.रणदिवे सर यांनी केले.

कार्यशाळेच्या आयोजनामागची विद्यालयाची भूमिका,एकलव्य अकॅडमीचे कार्य इ.बद्दल माहिती आपल्या प्रास्ताविकमधून प्रा.डॉ पी.एन.बेंदेवार यांनी मांडली.सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.कु.नितू खाडीलकर मॅडम व आभार चेतन धंदरे याने मानले.कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व विद्यार्थी प्रतिनिधींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here