Home चंद्रपूर देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून बँक ऑफ इंडियाच्या मागील वसाहतीत नालीचे बांधकाम सुरु

देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून बँक ऑफ इंडियाच्या मागील वसाहतीत नालीचे बांधकाम सुरु

101

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.18नोव्हेंबर):- येथील बँक ऑफ इंडियाच्या मागील वसाहतीत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे नालीचे खोलीकरण करून सिमेंट काँक्रिटचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.

या वसाहतीत राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पावसाळ्यात पूराचे पाणी शिरले होते. त्यामुळे काही घरे क्षतीग्रस्त होऊन साहित्याचे मोठे नुकसान झाले होते.ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिच्या व रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही समस्या तत्काळ सोडविण्यासाठी सांगितले.

त्या अनुषंगाने वेकोलितर्फे बँक ऑफ इंडियाच्या मागील परिसरात नालीचे खोलीकरण करून बांधकाम सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे आता पावसाळ्यातील पूराचे पाणी नाली द्वारे तलावात जाणार आहे त्यामुळे आता पूराचा फटका बँक ऑफ इंडिया मागील वसाहतीच्या परिसराला बसणार नाही.

बँक ऑफ इंडिया मागील परिसरातील नालीच्या बांधकामाची पाहाणी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केली.यावेळी भाजपचे कार्यकर्ते व वार्ड परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here