✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नांदेड(दि.18नोव्हेंबर):-निर्मल न्युरो रिहॅबिलीटेशन, अर्लिइंटरव्हेंशन अँन्ड चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने रविवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत वजिराबाद येथील वैद्य हॉस्पिटल येथे कर्ण यंत्राचे आणि वाचा व भाषा विकार उपचाराचे भव्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी वाचा व भाषा विकार तज्ञांच्या मार्गदर्शनासाठी केवळ १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या शिबिरात श्रवण तज्ञांमार्फत कर्णयंत्राचे प्रात्यक्षिक, कानाची तपासणी व अचूक सल्ला देण्यात येणार असून जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत तसेच श्रवणक्षमतेची चाचणी करुन योग्य व समर्पक कर्णयंत्राच्या बाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे व लहान मुलांमध्ये वयानुसार भाषा विकसित न होणे यावर उपाय व उपचार केले जाणार आहेत, नवीन तंत्रज्ञानाचे कानात न दिसणारे व छुपे कर्णयंत्राचे प्रात्यक्षिक तसेच भाषेचा विकास संथ गतीने होणे यावर उपचार व निदान, बोलता न येणे, हकलत/बोबडे बोलणे, उशिरा बोलणे, अशा रुग्णांसाठी निदान व उपचार, लहानमुले आणि प्रौढांमध्ये बोबडेपणा व तोतरेपणावर उपचार, जन्मतः ऐकू न येणाऱ्या मुलांसाठी विशेष मार्गदर्शन व उपचार, कॉक्लिअर इम्पलांट मार्गदर्शन व निवारण करण्यात येणार असून यासाठी लाभार्थ्यांना १०० रुपये असे माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.
यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर अनेकांनी सातत्याने या शिबिराचे आयोजन करावे ज्यामुळे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत या शिबिराचा लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती याची दखल घेत निर्मल न्युरो रिहॅबिलीटेशन, अर्लिइंटरव्हेंशन अँन्ड चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने पुन्हा या शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.