Home महाराष्ट्र पुरवठा विभागात नागरिकांची सनद लावलेलीच नाही – एमपीजे च्या लक्षवेधी धरणे आंदोलनात...

पुरवठा विभागात नागरिकांची सनद लावलेलीच नाही – एमपीजे च्या लक्षवेधी धरणे आंदोलनात मागणी

93

🔹दुकानदार – पुरवठा विभागाच्या तक्रारी चा नागरीकांनी केला उवापोह

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.17नोव्हेंबर) तहसील कार्यालयात नागरिकांची सनद याचा फलक लावणे नियमाप्रमाणे आवश्यक असताना सुद्धा पुरवठा कार्यालयामध्ये कार्यालयात मिळणाऱ्या सेवा त्यासाठी लागणारा वेळ, दर तसेच संबंधित जबाबदार व्यक्तीचे , काम न झाल्यास कुठे तक्रार करावी, दक्षता समितीचे नाव, लाच मागितल्यास तक्रार दाखल करण्यासाठी अधिकाऱ्याचे नाव व पत्ता लिखित स्वरूपात असणे त्याचे फलक लावणे आवश्यक असताना सुद्धा कार्यालयामध्ये जनतेची सनद लावण्यात आलेली नाही . ही फार गंभीर बाब असून प्रशासन व्दारे कायद्याचे पालन व कार्य कुशलते बाबत प्रश्न निर्माण होत होतात.

यामुळे कार्यालयीन काही कर्मचारी व दलाल हे संगणमताने भ्रष्ट -आचार करत आहेत .याची दखल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्वरित घ्यावी अशी मागणी मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस तर्फे घेण्यात आलेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनात करण्यात आली .

डेटा इंट्री साठी वारंवार चकरा, नवीन रेशन कार्ड साठी फिरवाफिरवी, असभ्य वागणून आर्थिक स्वार्थासाठी वेळ लावने या मुळे त्रस्त नागरिक आणी दलालांना संधी असा अनागोंदी कारभार पुरवठा विभागात सर्रास चालू चालू आहे . हीच गट जोड राशन दुकानदारा सोबत असून दुकानदार मालक होऊन बसलेले आहेत .पावती न देणे, कुटुंबातील व्यक्ती बाहेर गावी गेल्या चे सांगून माल कमी देणे, आरसी नंबर न देणे . दुकान वेळा पत्रकानुसार न चालविणे, साप्ताहीक सुटी चा दिवस सोडून महिना भर दुकान न चालविणे, अन्न दिवस साजरा न करने, तक्रार बुक न ठेवणे, तक्रारी साठी चे इ मेल नंबर, निरिक्षकाचे नाव ते केव्हा येतील त्याची माहीती चे फलक लावणे बंधनकारक असतांना या नियमांची दुकानदाराकडून पायमल्ली होत असतांना अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसून येते.

या सर्व समस्यांवर निकाली काढण्याची तसेच डाटा इंट्री साठी ऑपरेटर ची वाढ करणे, विधवांना अंतोदय कार्ड त्वरित सुरु करने, इश्टांग वाढविण्यासाठी तातडीने प्रयत्न करने, धान्य आल्या वर एस.एम.एस करने अश्या विविध मागण्या धरणे आंदोलनातील कार्ड धारक नागरीकां तर्फे करण्यात आल्या.आंदोलनात त्रस्त तीन शे च्या वर महिला पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here