Home चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते श्रीकृष्ण नगरच्या फलकाचे अनावरण

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते श्रीकृष्ण नगरच्या फलकाचे अनावरण

107

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15नोव्हेंबर):- घुग्घुस येथील म्हातारदेवी रस्त्यावरील, प्रभाग क्र. २ मधील, श्रीकृष्ण नगरच्या फलकाचे व माता मंदिर, श्रीकृष्ण नगरच्या फलकाचे अनावरण मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी वार्ड वासियांतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच वार्ड वासियांच्या हस्ते फलकाची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, श्रीकृष्ण नगरच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध आहे.
भाजपाच्या पुढाकारातून रस्ते, पिण्याचे पाणी, हातपंप, पथदिवे याची व्यवस्था श्रीकृष्ण नगरात करण्यात आली आहे तसेच श्रीकृष्ण नगरचा पुढेही सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, साजन गोहने, सिनू इसारप, विनोद चौधरी, सुचिता लुटे, शाम अरकिल्ला, रामस्वामी पुनम, अजय गांधारी, जेष्ठ नागरिक व वार्ड वासिय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here