✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.15नोव्हेंबर):-घाटकुळ ता पोंभुर्णा जि चंद्रपूर येथे येथे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि ग्रामस्थ घाटकुळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल पुणे येथील गोवंश अभ्यासक तथा साहित्यिक पंढरीनाथ चंदनखेडे यांनी स्वागताध्यक्ष विनोद देशमुख यांचा कृषी अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली : गोवंश हा ग्रंथ देऊन त्यांचा समारोपिय कार्यक्रमात सन्मान केला. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे, ज्येष्ठ साहित्यिक एड. लखनसिंह कटरे, समाज कल्याण उपायुक्त विजय वाकुलकर, राजगडचे शिल्पकार चंदू पाटील मारकवार, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,एड. राजेंद्र जेणेकर, श्रीकांत धोटे ,भाऊराव पत्रे, अरुण झगडकर, रामकृष्ण चनकापूरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पंढरीनाथ चंदनखेडे गेल्या आठ वर्षापासून साहित्य संमेलनात हजेरी लावत गोवंश विषयावर मार्गदर्शन करीत आलेले आहे. त्यांनी दोन पुरस्कार संमेलनात सुरू केलेले असून उपक्रमशील शिक्षकांसाठी साने गुरुजी शिक्षक पुरस्कार आणि गोसेवेचे कार्य करणाऱ्यास गोरक्षक पुरस्कार सुरू केले आहे. पंढरीनाथ चंदनखेडे यांचे कार्य प्रेरणादायी असून गोवंश सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी म्हटले.