✒️बीड, प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.15नोव्हेंबर):- शहरातील रईस सायकल मार्ट ते उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यलयासमोरच्या ३३ गाळ्यांवर आज सकाळी ६ वाजता नगर पालिका प्रशासन आणि पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले आहे तसेच या प्रकरणी ( दि १४ नोंहेबर ) मा जिल्हा न्यायालयाने ह्या कार्यवाईवर स्तगिती आदेश पारीत केले होते .
सदरचे आदेश घेऊन घेऊन अतिक्रमण धारक अब्दूल मुखिद मोहम्मद ईसोफोद्दीन हे गेवराईच्या मुख्याधिकारी विशाल भोसले यांना भेटले व मला हा आदेश मान्य नाही असे सांगून अतिक्रमण धारक यांना हाकलून दिले आहे त्यानंतर आज ( दि १५ नोंहेबर ) रोजी सकाळी ६ वाजता या कार्यवाईला सुरूवात केली व वरिल चार अतिक्रमण धारकाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , तिस ते चाळीस वर्षापासुन गेवराई शहरातील शिवाजी चौकातील रईस सायकल मार्ट ते उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यलय ह्या ठिकाणी ३३ अतिक्रमण धारक हे वास्तव्यास आहेत ते १९९४ पर्यंत गेवराई नगर पालिकेत भूईभाडे भरत होते परंतू सदरची जमिन ही गायरान असल्यामुळे पालिका प्रशासनाने या ठिकाणचे भूईभाडे बंद केले सदरची जमिन ही सर्वे नं १ मध्ये येत आहे त्यानंतर नगर पालिका प्रशासनाने ९ / ११ / २०२० रोजी अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीस बजावली सदरच्या नोटीस ला अतिक्रमण धारकांनी जिल्हा न्यायालयात चॅलेंज केले याचां प्रकरण क्रंमाक ६२ / २०२१ असा आहे.
यामध्ये ( दि १४ नोंहेबर ) रोजी जिल्हा न्यायालयाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात स्तगिती आदेश दिले परंतू या स्तगिती आदेशाला न जूमानता गेवराईच्या मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सदरचे आदेश धुडकावले आहेत.
गेवराईच्या मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी बळाचा व पोलिस प्रशासन वापर करून कार्यवाही केली या कार्यवाहीत सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती आहे .
तसेच या प्रकरणी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही तसेच ज्या अतिक्रमण धारक यांच्याकडे स्तगिती आदेश आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.