✒️नितीन पाटील(विषेश प्रतिनिधी)
नेरी(दि.15नोव्हेंबर):-समाज परिर्तनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर क्रांतिकारक, वस्ताद लहुजी साळवे साळवे यांनी वयाच्या 22 व्या वर्षी रणांगणात लढीन तर देशासाठी मरीन तर देशासाठी अशी शपथ घेतली, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत खंबीर पने उभे राहून सावित्रीबाई फुले यांनी उचललेल्या शिक्षण कार्यात सहभागी होत त्यांच्या स्वरक्षणाची जबाबदारी स्वतः लहुजी साळवे यांनी घेतली, त्यांचे कार्य खूप प्रेरणादायी असून युवकांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी असे आवाहन लहुजी साळवे जयंती दिनी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी केले.
लोकशाही, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समिती नेरीच्या वतीने उस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास डांगे, प्रमुख अतिथी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, प्रा, ज्ञानेश्र्वर नागदेवते, शिवसेना निवासी उपतालूका प्रमुख सुधाकर निवटे, शिवसेना महिला आघाडी उपतालुका संघटीका विद्या घुघुसकर, स्मारक समिती अध्यक्ष किशोर उकुडे मंचावर उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांनी उपस्थीताना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर ऊकुडे, संचालन लहू सेना अध्यक्ष सुदर्शन बावणे यांनी केले.
कार्यक्रम यशसवी करण्याकरिता राजू बावणे, विनोद उकूंडे, आशिष ऊकुंडे, सुनील मुंग्ले, शंकर ऊकुंडे, संजय डोंगरे, आकाश ऊकुंडे, शंकर डोंगरे, हरीचंद्र शेंडे, वासुदेव बावणे, अशोक बावणे, कुसुमबाई उकुंडे, निर्मला बावणे, देवानंद बावणे, यांनी अथक परिश्रम घेतले,