✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.15नोव्हेंबर):-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वाहन चालकांकरिता अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहतुकीचे नियम, वाहन चालकांची सुरक्षा, आरोग्य आदी विषयावर प्रशिक्षण युक्त कार्यशाळेचे आयोजन करावे असे मत चिमुर वाहन चालक-मालक संघटनेचे बबलू कुरेशी यांनी व्यक्त केले. अपघाताच्या संख्येत घट आणायची असेल तर जिल्ह्यात चालक कार्यशाळेचे आयोजन उपप्रादेशिक अधिकारी चंद्रपूर यांनी करावी.
नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त श्री भिमनवार आले होते, तेव्हा मोटार वाहन कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी म्हणजेच दंड वसुली, संख्यात्मक वाढ हे नसून अपघाताचे प्रमाण कमी करणे व रस्त्यावरील सुरक्षा बाबत गुणात्मक बदल घडून आणणे गरजेचे आहे तेव्हा अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांची भूमिका मुख्य आहे.
चालकांना वाहतुकीबाबत योग्य मार्गदर्शन, नियम, रस्ता सुरक्षा, रस्त्यावर दिलेले सांकेतिक चिन्ह, मद्यपान करून वाहन चालू नये, वाहनावर योग्य ते नियंत्रण ठेवावे, वाहनाची योग्यता प्रमाणपत्र, असलेलेच वाहन रस्त्यावर वाहतुकीस आणावे ही सगळी माहिती चालकांना परिवहन अधिकारी चांगल्या प्रकारे देऊ शकतात. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, त्यामुळे अपघातात नक्कीच घट होईल अशी मागणी चिमूर चालक-मालक संघटना चे बबलू कुरेशी