🔹मुलांनी घेतला मनमुराद आनंद व पुस्तक स्टॉल ने वेधले सर्वांचे लक्ष !….
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.14नोव्हेंबर):- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये बालदिनानिमित्त पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे काउंटर आणि मनोरंजक खेळांनी सजलेल्या आनंदमेळ्याचा आनंद विद्यार्थी – पालक व शिक्षकांनी देखील लुटला.कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी पंडित नेहरुंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. अयान खाटीक, जेद खाटीक, मनस्वी पाटील, पूर्वा जाला या विद्यार्थांनी चाचा नेहरूंचे कार्य तसेच बालदिनाचे महत्व वर्णन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिरीन खाटीक यांनी केले. प्रतिमा पूजन झाल्यानंतर विद्यार्थी – पालक व शिक्षकांनी आपला मोर्चा आनंदमेळ्याकडे वळवला. अनेक विद्यार्थांनी व पालकांनी खाद्य पदार्थांचे काउंटर सजवले होते. यामध्ये दाबेली, समोसा, कचोरी, पास्ता, उसळ, भेळ, कप केक, गुलाबजाम, चॉकलेट – कुरकुरे, इडली, खमंग इ. विविध प्रकारचे चटपटीत मेनू खवय्यांना आकर्षित करत होते. काही विद्यार्थांनी खेळाचे काउंटर सजवून मनोरंजन केले. विद्यार्थी – पालक, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी आनंदमेळ्याचा मनमुरादपणे आनंद लुटला…यामध्ये हर्षल पाटील या विद्यार्थ्यांने लावलेल्या काउंटर कडे अनेकांचे लक्ष वेधले गेले.
पोटाची भूक भागली असेल तर थोडं इकडे या आणि डोक्यासाठी देखील वैचारिक खाद्य घ्या. बहुजन महापुरुष व महामातांच्या बद्दल माहिती असणारे लघु ग्रंथ याठिकाणी उपलब्ध होते. कार्यक्रम प्रसंगी हर्षल चे वडील पी.डी. पाटील सरांनी रावतोळे मॅम व गावित सरांना महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे चरित्रग्रंथ भेट स्वरूप दिले.
कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थीनी तसेच पालक वेग बहुसंख्येने उपस्थित होते.