Home महाराष्ट्र पारध येथील गोशाळेला एक लाखाचा निधी-गोशाळेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

पारध येथील गोशाळेला एक लाखाचा निधी-गोशाळेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

139

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.14नोव्हेंबर):-तालुक्यातील पारध येथे दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान जयसिंग महाराज गोरक्षण संस्था पारध र.नं. २१७ चे पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.उद्घाटन प्रसंगी गोरक्षणाकरिता एक लाख रुपयाचा धनादेश तत्काळ महाराष्ट्र राज्य गोशाळा महासंघाचे डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी जाहीर केल्याने गोप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी गोशाळेला मित्र मंडळाकडून जास्तीत जास्त देणगी कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी नियोजन करणार असल्याचे सांगितले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गोशाळेची फित कापून व दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उद्घाटन प्रसंगी पंकज पाल महाराज यांनी प्रस्तावना सादर करीत म्हणाले की, गोमातेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक गोप्रेमीची आहे‌.आपल्या आईप्रमाणे गाईची सेवा व देखभाल प्रत्येक गोप्रेमींनी केली पाहिजे. पुढे म्हणाले की पारध येथील गो शाळेला जास्तीत जास्त दात्यांनी देणगी देऊन गोशाळेचे रक्षण केले पाहिजे असे आवाहन प्रास्ताविकेतून केले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यसनमुक्ती सम्राटचे ह.भ.प. खोडे महाराज यांनी दारू, सिगरेट,खऱ्यावर विनाकारण खर्च न करता तो खर्च गोरक्षणासाठी दान करावा असे आवाहन केले.

उद्घाटन सोहळा प्रसंगी हभप भगवान कोकरे महाराज म्हणाले की, गोरक्षणासाठी जेवढे काही सहकार्य करता येईल तेवढे करावे. गाय आपली माता समजून त्याचे रक्षण करावे. सोहळ्याचे संयोजक महाराष्ट्र गोशाळा महासंघाचे डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी गो प्रेमींना महत्त्वाची माहिती विशद केली. त्यात ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात सध्या लहान-मोठे अशा ९५० गोशाळा सुरू आहेत.त्या गोशाळेत वृद्ध,भाकड,अपंग अपघातग्रस्त,आजारी व अनाथ गोवंशाचे पालन पोषण व संभाळ होत आहे. तसेच पोलीस विभागामार्फत कत्तलीकरिता घेऊन जाणारे गोवंश पण पालन पोषण केले जाते.त्यामुळे पारध येथील गोशाळेला देखील गोवंशाचे रक्षण,संवर्धनाकरिता पाठविण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. आजही महाराष्ट्रात जवळपास दोन लाख गोवंशाचे कोणत्याही शासकीय मदती शिवाय पालन पोषण व संभाळ अशा गोरक्षण संस्थाकरीत आहे.

त्यांना शासकीय मदत मात्र मिळत नाही हे दुर्भाग्य म्हणावे लागेल. महाराष्ट्रामध्ये खिल्लार,डांगी, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व कोकण कपिला अशा स्थानिक जातीमुळे महाराष्ट्रात असलेले जैवविविधतेचे वैभव नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत,असे मनोगत भाषणातून व्यक्त केले. उद्घाटन सोहळ्याला प्रामुख्याने लक्ष्मण पवार, सुधाकर आडे, राहुल गाडे, महंत जगदीश बाबा, श्रीकांत चव्हाण, मनोज सुरय्या, वाशिम येथील गोरक्षण संस्थेचे अध्यक्षासह जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील व तालुक्यातील हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक म्हणून शेषराव राठोड, विलास महाजन,विजय जाधव,अशोक वाडते, रमेश राठोड, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनुकूल चव्हाण, गिरीष अग्रवाल,जि.प. सदस्य बाबुसिंग आडे,रनविर पाटील, राहुल गाडे, भाऊराव जाधव, समाधान राठोड, पांडू महाराज,उत्तम आडे, युवराज महाराज तथा गावकरी, शिष्टमंडळ, जयसिंग महाराज गोरक्षण शिष्ट मंडळ पारधचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जयसिंग महाराज गोरक्षण संस्था पारधचे अध्यक्ष एम.आर.राठोड व त्यांच्या टीमने आथक परिश्रम घेतले.उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी तर उपस्थितांचे आभार पारध गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष एम.आर.राठोड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here