✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.14नोव्हेंबर):- घुग्घुस येथील जेष्ठ नागरिक संघ व सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे सोमवार १४ नोव्हेंबर रोजी संत गाडगे महाराज स्मारक निर्माण, तुकडोजी नगर वार्ड क्र. ६, घुग्घुस येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
या स्वच्छता अभियान मोहिमेत जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नीलकंठ नांदे, नंदकुमार ठेंगणे, शामराव बोबडे, साजन गोहने, बबलू सातपुते, गंगाराम बोबडे, जनाबाई निमकर, भय्याजी वाघमारे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन परिसराची स्वच्छता केली.
घुग्घुस येथील जेष्ठ नागरिक संघ व सत्यशीव गुरुदेव मंडळातर्फे दर सोमवारी सार्वजनिक ठिकाणच्या धार्मिक स्थळांच्या परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. हा तेरावा आठवडा आहे.