🔹पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्या बद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनतुन मागणी
✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.14 नोव्हेंबर):-भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यवतमाळ येथील विश्राम गृहात दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत उद्दामपणाचे वर्तन करीत पत्रकारांना दमदाटी करून त्यांना सुपारिबाज संबोधल्याच्या कृतीचा दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघ अधिकृत उमरखेड तालुका च्या वतीने सभा घेऊन जाहीर निषेध करण्यात आला. या पत्रकार परिषदेला उपस्थित भाजप जिल्हा अध्यक्ष व आमदारांच्या भूमिकेवर देखील पत्रकार संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
यवतमाळ भाजपाने शुक्रवारी दि 11 नोव्हेंबर रोजी चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद आयोजित करून पत्रकारांना निमंत्रित केले होते.
पत्रकार परिषदेत पत्रकार बंधूंनी स्वाभाविकच जिल्ह्यातील मंत्री संजय राठोड यांचेवर वाघ यांनी पूर्वी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारले मात्र त्याला नीट उत्तर देण्याऐवजी त्यांचा तोल सुटला, त्यांची प्रस्तावना झाल्यानंतर पत्रकारांनी अडचणीचे प्रश्न विचारूच नये अशा पद्धतीने त्यांचे वर्तन सुरू झाले.
सुरवातीपासूनच पत्रकारांना दमदाटी केल्यासारख्या त्या बोलू लागल्या, एव्हढेच नव्हे तर पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, पत्रकार सुपारीबाज आहे अशा बावचळल्या शब्दात त्यांनी पत्रकारांवरच गरळ ओकली.
चित्रा वाघ ह्यांची भाषा पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. याच अनुषंगाने 13 नोव्हेंबर 2022 रोजी उमरखेड येथील दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या सदस्यांची बैठक घेऊन निषेध नोंदविण्यात आला व चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी सर्व पत्रकारांची समाज माध्यमांवर माफी मागावी…!
अशा आशाची मागणी आज दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून मागणी करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजहरउल्ला खान, सचिव लक्ष्मीकांत नंदनवार, निळकंठ धोबे, वसंत देशमुख, साहेबराव घात्रक डॉ. विशाल माने, अंकुश पानपट्टे, प्रशांत भागवत, प्रा. प्रदीप इंगोले, रवी भोयर, अविनाश मुन्नरवार, व्यंकटेश पेन्शनवार, शैलेश ताजवे, अजय कानडे, सलमान खान, ताहेर मिर्जा, सागर शेरे, गजानन भरती, संजय देशमुख, डॉ शिवचरण हिंगमिरे आदी पत्रकार उपस्थित होते.